2023 बाय बाय करा
2024 मध्ये करा बदल !
2023 हे वर्ष संपत आहे. आणि थोडे दिवस राहिले संपायला मग आपण आपल्या नवीन वर्षात काय काय करायचे ? आणि काय नाही करायचे ? याची पूर्ण सगळी यादी तयार करतो. आणि आपले प्लॅन किंवा नियोजन करत असतो. पण 2023 या वर्षात आपण काय केलं आणि किती यश मिळवले किंवा किती अडीअडचणी आल्या ह्या अनुभवलेल्या असतील. . काय चांगले करू शकलो असतो आणि काय करायला हवे ते करायचं असे विचार करू लागतो .
आता वाटतं 2023 वर्ष संपते तेव्हा आता 2023 ला बाय बाय करून नवीन वर्षामध्ये प्रवेश करतो.पण आपल्यामध्ये काय बदल करायला हवे म्हणून ध्येय ठरवत काही काही असतो किवा तुम्ही ठरवले असेल सुद्धा. पण ते पूर्णपणे जाते का? हो जात नसेल किंवा जात असेल? असं आपण संकल्प करत असतात.
कोण वजन कमी करायचं करतो ,कोण मला गाडी संकल्प करत असतो. मला यावर्षी नवीन घर घ्यायचं, मला या वर्षी मला बाहेर world tour जायचे असे संकल्प करत असतात.
काही संकल्प असे भावनिक पण असतात इमोशन पण असतात आपल्या समाजामध्ये मानसिक आणि भावनिकगोष्टच विचार केला पाहिजे.
चला तर पाहूया आपण 2023 ला बाय बाय करून 2024 या वर्षांमध्ये आपण काय काय गोष्टी करू शकतात काय करायला पाहिजे?याची आपण गोष्टी पाहूया.
जास्त विचार करणं बंद करणे
आपण दिवसभरातून किवा दिवसातून खूप वेळा सतत विचारती वर विचार करत असतो. मला आज हे करायचे, मला आज ते करायचे .मलाच तिकडे जायचे आहे. आज मला इकडे फिरायला जायचे. आज याच्या माझ्यासोबत मीटिंग आहे .
आज व्यवस्थित होईल ना आज कसं होईल आजचा दिवस कसा जाईल असे नाना प्रकारचे प्रश्न आपल्या दिवसभरात सतत येत असताना आपण जास्त विचार करत असतो.
आणि आपण भविष्यकाळामध्ये जगत असतो सध्या आपण वर्तमान मध्ये आहोत हे आपल्याला माहिती असून सुद्धा आपण जास्त करून भविष्यकाळ किंवा भूतकाळामध्ये जगत असतो. जास्त भविष्यकाळाचा विचार करून आपलं जे क्षण आहे जे आनंदच्या क्षण ते आपण आनंद व्यक्त करत नाही. कारण आपल्याला उद्याची चिंता असते.
आणि त्याचा टेन्शन घेऊन आपण आजचा दिवस म्हणजे आजचा वर्तमान काळ आपण खराब करत असतो. आणि अनेक प्रश्न आपल्याला पडलेला असतो.
त्यामुळे आत्ता तुम्ही तुम्ही वर्तमान मध्ये रहा. आणि वर्तमान मध्ये जे तुम्ही करत आहात ते त्याचा आनंद घ्या .आणि समाधानी सुखी राहा.
एकदम न्यूट्रल राहणार आहे
न्युट्रल म्हणजे काय ? तर आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली तर आपल्याला खूप आनंद होतो. किंवा नाही घडले तर आपण दुःखी होतो.
पण जे एखादा आनंद झाला तर आपण खूप उत्साही होतो. आणि एखादा दु:खद घटना झाली तर आपण खूप निराश होतो. पण जेव्हा दुःखाचा क्षण किंवा आनंदाचा क्षण असा तेव्हा जास्त व्यक्त नाही करयचे. दुःखाला तर ठीके दुःख आलं माझं माझ्या बाबतीत हे झालं आणि जर सु;खाला आले असेल तर म्हणजे एखादी गोष्ट चांगली घडली तर काय म्हणायचं की हा छान झालं.
ओके म्हणजे जास्त जास्त सुखाला पण कवटाळून बसत किवा जास्त सु;खाला कवटाळून बसायचं नाही. म्हणून असं दुःख आलं तरी हो म्हणायचं चुकलं तरी हो म्हणत असतो आणि त्यामुळे काय होतं आपल्या मनाला चांगली सवय लागते. आणि आपण पुढे जातो ना आपल्या आयुष्यात आपल्या संतुलित राहतो.
खरोखर आनंदी आणि समाधानी कसे राहावे
आता आनंद म्हणजे कसं व्यक्त राहता येतं तर ते आपल्यावर निर्भर असतं.एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आपण आनंदी राहतो. मी इकडे गेले की मी खुश होणारे ,मी तिकडे गेले की खुश होणारे ,कधी हि मला गोष्ट मिळाली की मी खुश होणार .आहे मला हे भेटलं तर मी खुश राहील खूप खुश आहे असा पण म्हणत असतो.
पण आपलं हे आनंद हे आपलं खरं नसतं म्हणजे टेम्परेरी असतं आपण आता सध्याचे युगात जगत आहोत. एकदम गोष्ट क्षणिक सुखासाठी जगतात असं म्हणजे हा पूर्णपणे खरा खरा आनंद नसतो. तर खरा आनंद म्हणजे आपण कोणत्याही गॅजेट शिवाय कोणत्याही वस्तू शिवाय आपल्याला त्या कोणत्याही गोष्टीतून आनंद मिळवता येत असेल तर तो खरा खरा आनंद असतो.
क्षणिक आनंदासाठी तुमचा वेळ आणि पैसे तर घालवत असता . मग यातून तुम्हाला क्षणिक आनंद उपभोक्ता येईल परंतु खरोखर आनंदा कधीच उपभोगता येणार नाही .
या शिवा आपल्याला मिळणार पण आनंद असतो. म्हणजे अध्यात्मिक ची जोड असेल मेडिटेशन असेल यामधून जर खरा आनंद आपल्याला अनुभवता येतो.
एक समाधान ने मन संतोष होतं. आणि त्यातून आपल्याला आवड निर्माण होते. सतत कोणतीही गोष्ट आपल्याला मिळाली की, मी आनंदी होईल .अशी वृत्ती चांगली नाही. आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा.
भावनिक लक्ष्मन रेषा पण आपल्या पाहिजेत.
भावनिक लक्ष्मण रेषा आखणे हि खूप काळाची गरज आहे.
कारण स्वतःसाठी आणि इतर पासून स्वतःसाठी आखले पाहिजे . आपण एखाद्या व्यक्तीसाठी एवढी मदत करतो. प्रत्येक वेळेला आपले काम टाकून त्यांचे कामाला मदत करतो .
पण एखादी गोष्ट आपल्या सोबत वाईट कृत्या केल्या असताना पण तरीपण वेळोवेळी जाऊन मदत करतो कि, ते जाऊदे असे म्हणून तिच्या वेळेला सोडून पुन्हा त्या व्यक्तीला विचार करून मदत करतो.
पण त्या व्यक्तीला आपली किंमत नसते आपली व्हॅल्यू नसते परंतु मग ते आपल्याला आपण मदत करतो निस्वार्थ मला पण त्याचा आपल्याला त्रास होतो
मी एवढे करते तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी तरी व्यक्ती आपल्या सगळ्या समोर किंवा पाठीमागे खिल्ली उडत असते. अशा व्यक्तीपासून लाभ राहण्यास तेवढे चांगले आहे. म्हणून तर इतर व्यक्ती आपण देव शोधात असतो . परंतु इतर व्यक्ती आपल्यात देव का शोधात नाही . त्यांना आपल्यात पण देवच दिसत नसतो ना ?
मग आपण कोणाचा विचार लारायचा नाही. अशा वेळेला आपले इमोशनल मन ठेबाजूला ठेऊन द्वूयायचे. नवीन वर्षात 2024 ला आपल्या पाहिजेत त्या व्यक्तीची मदत करा .
जे खरंच गरज असेल तर एखाद्या व्यक्तीला हा तेवढापुरटेच तुम्ही मदत करा . पण जास्त अटॅचमेंट होऊ नका.
म्हणजे तेवढेच तेवढे मी ठेवेल. असा विचार करून पुढे जात राहा .
कृतज्ञ व्यक्त करणे
कृतज्ञ व्यक्त करणे ही खूप गरजचे आहे.
आपल्या शरीराला आणि मनाला कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आपण थँक्यू म्हटलं पाहिजे.आपल्याला जे देह दिलेले आहे देवाने त्या शरीराचे प्रत्येक ठेवण ही वेगवेगळी असते.
शरीराचे त्यामुळे रात्री रात्री झोपताना आपण थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू देवा देवाच्या पाया पडून किंवा युनिव्हर्सल थँक्यू युनिव्हर्स म्हणून आय एम सॉरी आय लव यू असे वाक्य आपण म्हणू शकतो.
त्याने काय होईल तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट तुमच्या लाईफ मध्ये येणार ही ,तुमच्यासाठी व्हॅल्युबल असेल .आणि तुमच्या आयुष्य सुलभ होण्यास मदत होईल. आणि एवढ्या फास्ट गोष्ट तुमच्या जीवनशैलीमध्ये घडून येतील की तुम्हाला समजणारच नाही.
प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहणे हे चांगलेच असते. जसे की आपण दिवसभरात एवढं धावपळ करतो ,काम करतो आणि रात्री झोपताना सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. पण पण झोपताना देवाच्या पाया पडतो. आणि म्हणतो उद्याचा दिवस सकाळी उठल्यानंतर उद्याचा दिवस मला चांगला जाव असं म्हणतो.
सकाळचा दिवस चांगला जाव असं म्हणतो ,मग ते आपण सकाळी उठवणं म्हणजे हे देवा युनिव्हर्सचं काम आहे म्हणून थँक्यू म्हणणं म्हटलं पाहिजे.
येणारा नवीन वर्ष हा त्याच्यासोबत अनेक संधी घेऊन येतो. ज्यांना आपल्या जीवनात बदल करायचा असतो. ते बदल घडवून आणतात. हे काही अशक्य नाही ,यासाठी तुम्हाला काही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे .कारण येणारे नवीन वर्षाला हे आपल्या जीवनामध्ये काही रंग भरायचे आहेत , सजवायचं असतं
पण ते आपल्या आवडीनिवडी नुसार इथे या गोष्टींनी आपण बघत असतो कि, प्रत्येक यशस्वी व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. आणि ज्याने आपली उद्दिष्ट ओळखले ते त्याच्या जीवनामध्ये उद्दिष्ट पर्यंत पोहोचतात.
चला तर आपण पाहूया आवड निवड कशी असावी .आपण आपल्या लाईफ मध्ये बदलले पाहिजे. आणि बदल घडवला पाहिजे.
|2023 बाय बाय करा| 2024 मध्ये करा बदल ! | |
मनावर घेणे थांबवा
मनावर घेणे थांबवायचे कारण कोणती गोष्ट हे आपल्या मनावर घेतली, तर त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि मनावर सुद्धा खूप होतात. ते त्यामुळे आपले शरीर हे कमकुवत बनते आणि मानसिक पण ताण खूप येऊ शकतो असे आपण म्हणत असतो.
आणि सगळेच माझे आहे. म्हणतात ना कि, माझ माझ भ्रांतीचे ओझ होतं सगळं माझं म्हणून आपण जगायचं आपण जगत असतो आणि नको ते टेन्शन घेऊन खांद्यावर घेऊन फिरत असतो. जेव्हा जीवनात सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याला लगेच मिळतात ना ? तेवढ्या लवकर आपल्याकडून काढून घेतल्याही जातात.
मग आपण दुःख होतो. आणि असाच विचार करत होतो, नेहमी माझ्यासोबत असं का होतं? मीच का ?असं म्हणू लागतो. परंतु जे काय होते ते चांगल्यासाठी होते प्रत्येक गोष्ट हे नियम आणि वेळेनुसारच ठरते वेळेच्या आधी कधीच भेटत नाही आणि वेळेच्या नंतर पण कधी भेटत नाही.
म्हणतात ना "आपना टाईम आएइगा" म्हणजे आपली वेळ येईल तेव्हाच आपल्याला सगळं काही भेटत असते. त्यामुळे जास्त विचार करायचा नाही आणि जास्त मनावर घ्यायचं नाही.
स्वतःला वेळ काढून वेळ दिला पाहिजे
स्वतःला वेळ काढून वेळ देणे म्हणजे आपण नेहमी म्हणत असतो कि, मला वेळच नाही. आज मला हे आणायचं ते आणायचं तर माझ्याकडे वेळच नाही. माझ्याकडे आज उद्या वेळ नाही. परंतु वेळ आपल्याला काढावे लागतो आणि स्वतःवर दिला पाहिजे ज्याने काय जीवनात आपल्याला काय करायचे आहे काय गोष्टी करायचं नाही त्याने ठरवता येऊ शकतो .
त्यानुसार वेळेला म्हणतात ना टाईम "इज मनी "तस आहे वेळेला खूप महत्व आहे. वेळेत त्या गोष्टी सगळ्या वेळेमध्ये घडल्या पाहिजेत म्हणून स्वतःला वेळ काढून स्वतःला वेळ दिला पाहिजे. जास्त लोक आपल्यावर लक्ष देत नाहीत म्हणजे आपल्या शरीरावर आणि मनावरती.
सतत रडतडत बसतात. हे का होते ? का हि वेळ आली ? आपल्याला काही जमत नाही .परंतु त्यासाठी आपण स्वतःवर काम करत नाही आणि स्वतः वेळ काढून आपण ते करत नाही त्यामुळे आपल्या बाबतीत असं होत असतं.
त्यामुळे वेळेला प्राधान्य द्या आणि स्वतःच्या शरीरावर आणि मनावर त्याचा प्रभाव पडायला सुरुवात होईल.
लोक काय म्हणतील
लोक काय म्हणतील असा विचार करून थांबवा .कारण लोक काय म्हणतील हे विचार करून आपण आपल्या आवडणाऱ्या कामापासून आपण लांब राहतोय . आपल्याला काय आवडतं काय नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
नाही की लोक काय विचार करतील, लोक काय म्हणतील यावर लक्ष नाही दिले पाहिजे.
म्हणतात ना
"कुछ तो लोग कहेंगे
लोगो काम है कहना "
गाणं तुम्ही ऐकलं असेल ना परंतु तुम्ही काय करता याकडे कसलाही संबंध नसतो. तुम्ही तुमचे कामावर लक्ष द्या. तुमच्या कामावर फोकस व लक्ष द्या. आणि तुम्ही पुढे जात असेच काम करत जा .
जेव्हा तुम्ही काम करत करत पुढे जाता तेव्हा ते लोकांना तुमचं बघवत नाही आणि लोक तुम्हाला आद्काठी मारायला सुरुवात करतात .तेव्हा त्यांना खटकत असतं तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करतात. म्हणून लोक लोकांचा जास्त विचार करायचा नाही.
चुका मधून शिकले पाहिजे
चुका या माणसाकडूनच होत असतात. सुधारला गेल्या पाहिजेत जेव्हा एकच चूक तुम्ही सारखी करत असेल तिथे तुमची सवय होऊन जाते. पण त्यात सुधारणा केली पाहिजे.
चुका करणे वाईट नाही परंतु त्याचे वारंवार चुका करणे हे वाईटच आहे. जेव्हा तुम्ही एखादी कृती करता करत असता तेव्हा तुम्ही चुकत असतात .ते चूक काय झाले? काय कारण होते ? हे शोधून छान प्रकारे तुम्ही सुधारू शकता.
चुका तर माणसाचे जीवन हे सुधारू शकते. पण कधी कधी एक चूक पण खूप मोठी किंमत चुकावी लागते. किंवा एका चुकीने माणसाचे जीवन उध्वस्त करू शकतो.
म्हणून कधी पण निर्णय हे स्वतः विचार करून घेतले पाहिजे दुसऱ्याचे ऐकून कधीच निर्णय घेऊ नये म्हणून दुसऱ्याच्या ऐकणे बंद करून स्वतःचा स्वतः निर्णय घेतले योग्य आहे.
ऐकावे जनाचे
करावे मनाचे
हि म्हण आपल्याला मराठीत माहिती आहे.
वचन देणे किंवा प्रॉमिस
कधी पण आपल्याला झेपेल एवढेच प्रॉमिस करावे जास्त प्रॉमिस करायचे नाही त्याने आपल्या मनावर किंवा इतर परिणाम होऊ शकतो
प्रॉमिस वेळ काळ असू शकते प्रॉमिस मध्ये तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर तुम्ही दुखी होता आणि इतर पण म्हणुन समजून जाणून बुजून प्रोमिसे करा.
तुलना करणे टाळणे
तुम्ही कधीही कोणाबरोबर इतरावर तुलना करू नये .याने तुम्हाला तुमची व्हॅल्यू मिळणार नाही. असे केले कि तुमच्या मनात इतरांचे विचार येतात. आणि तुमचा जास्त लॉस करून घेत आहे .
जर तुम्हाला एखाद्या तुलना करायची असेल ,तर तुमच्याशी करा. जेणेकरून तुम्ही स्वतःवर लक्ष देऊन चांगल्या गोष्टीत बदल होईल आणि तुमच्या आयुष्य सुलभ होईल.
वाचत राहणे
रोज दोन मिनिटांसाठी एक पुस्तकाचे पान तरी वाचत राहणे. तुमच्या माहितीत भर पडते. आणि व्हॅल्यू वाढते. तुमचे जीवन सुलभ होऊ शकते.
किमान दोन मिनिटांसाठी तर तुम्ही रोज वाचत राहिला. तर त्याने तुम्हाला सवय लागेल. चांगल्या सवय लागला की आपोआप आपलं जीवन, आयुष्य सुधारायला लागते. आणि आपलं मन शांत राहतात.
स्वतः प्रेम केले पाहिजे
सुखदुःख हे आपल्या जीवनात येत असतात.तर त्यामुळे तुम्ही जास्त होरपळून जाऊ नये . जर एखादी व्यक्ती तुम्हला सोडून गेली तरी त्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात खूप मोठा परिणाम करत असतो. पण कोणी सोबत राहू शकत नाही. फक्त तुमच्या शिवाय. तुम्ही तुमचे सोबत असतात.
स्वतःला वेळ दिला पाहिजे
प्रेम केलं पाहिजे. स्वत; वर वेळ घालवला आला पाहिजे जेणेकरून तुम्हाला नवीन आशा व्यक्ती तुम्हाला ओळखण्यास मदत होते.
जीवन हे एक मिनिटांनी, एक वेळ महिन्यात घडत नाही तर त्याला बराच वेळ लागतो असतो. तुम्ही सुरुवात करा यशस्वी जीवन होण्यासाठी.
तुम्हाला यशस्वी जीवन होण्यासाठी तुम्हाला मदत होईल . तर कसा वाटला तुम्हाला हा नवीन 2024 मध्ये बदल करायचा जेणेकरून तुमचा आयुष्य छान सुंदर समाधानी आणि आनंदी व्यक्त होईल. आणि आनंदी राहील आणि स्वतःवर खूप प्रेम करा.
कसा वाटला तुम्हला लेख नक्की कमेंट करून सांगा
धन्यवाद
Don't spam comment