|बालपण हरवले आहे का ? | Is childhood lost?|

0

  |बालपण हरवले आहे का ?  | Is childhood lost?|



         बालपण म्हंटले की काय आठवते ? तर फक्त मज्जा,मस्ती,नुसता धिंगाणा ,आणि गोड आठवणी असतात ना बरोबर ना? काय करतोय,कसे वागतोय याचा कोणलाच काही फरक  पडत नाही हो ना ? बालपण म्हंटले की, आठवतात गोळ्या, चिक्की, कँडी, चाकलेट, मग काय मज्जा असते.नको ते टेन्शन नको तो अभ्यास  नको त्या कटकटी मस्त फिऱ्यचे,छान खेळायचे. 

म्हणतात ना,
 "लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा"
आपण लहान असताना काय करतो आणि किती हट्ट आणि लाड करून घेतो ना. 

 आपण कोणतीही गोष्ट मागितली आपल्याला ती लगेच मिळते जर नाही मिळाली तर तो लहान आहे दे त्याला असे मावशी, मामा असतात च आपले लाड पुवण्यासाठी.अजी,आजोबा मावशी,मामा ,आई ,बाबा,काका,आत्या असतात ना लाड करायला.लहान असताना 
आपण 
आजकाल कुटे तरी बालपण हरवले आहे. सध्या या मोबिलीच्या,कॉम्प्युटर,5 जी चीच्या युगात कुटे आहे ते दिसत नाहीं.  बालपण म्हंटले की, तो असो की ती दोघांचे पण सेम असते.


  बालपण म्हणजे राहिला नुसत्या आठवणी. बालपण म्हणजे खेळ , निखळ आनंद ,मज्जा होय. बालपण आठवते की ,सगळीकडे फिरणे कधी झाडावर चढून आंबे काढणे ,कधी पेरूच्या झाडावर चढून पेरू  काढणे.

 त्यावेळी झाडावर चढता आले म्हणजे आपण एक लढाई जिंकलो जिंकलो  असे असायचं असं फील व्हायचं.

आंबा, चिंच, जांभूळ , झाडावरून  काढून  खाण्यात जी मज्जा होती ती आज विकत घेऊन खाण्यात बिलकुल नाही.

 शाळेची बेल वाजले की कधी घरी जायचं आहे. दफ्टरे टाकून कधी कधी खेळायला जाईल असे वाटत असायचे. शाळेत खेळलो तरी पण मन भरायचे नाही.

 ते मैत्रिणीच्या घोळक्यात कधी जायचं ते  कळायचे नाही. पावसाळी पहिला पाऊस कधी पडेल आणि त्या पहिल्या पावसात भिजू  शकतो भिजून आनंद कसा घेता येईल याचे वाट बघत बसायचे.

 कधी कधी पावसात भिजता यावे म्हणून मुद्दाम पण छत्री घेऊन जायचे नाही. कधी कधी तर आज पाऊस येणार नाही म्हणून छत्री घेऊन न जायचे तेव्हाच पाऊस पडायचा .

आणि पाऊस आमच्याशी फसवतो  का असं वाटायचं. आणि पाऊस पडायचा  आम्ही  पावसाला  खूप ओरडायचे  का पाऊस आला .आज मुद्दाम म्हणून पाऊस आला  आणि  आज पाऊसाने फसवलं .


माती वरती पडणारा  पहिला पाऊस त्याने माती खावीशी वाटायची कारण मातीचा सुगंध सगळीकडे  पसरायचा.माती  खावी अशी खावीशी वाटावी. मात्र असे कधी  व्हायचं नाही .

 कधी कधी पाऊस जास्त पडून  नदीला पुर यायचा आणि पुलावरून पाणी व्हायचे . आणि शाळेला सुट्टी पाहिजे असे वाटयचे. पुन्हा पुन्हा सारखे जास्त पाऊस पडून  शाळेला सुट्टी भेटेल का?

पावसात पण खेळायला छान वाटायचं आता आट्यापाट्या ,पकडा, पकडी, डब्बा एक्सप्रेस, असे खेळ खेळून आनंद खूप लुटायचं नंतर अभ्यासाला बसण्या सर्व गोष्टी आठवल्या की असं वाटते की पुन्हा बालपण दे रे देवा असे वाटते .

हिवाळ्या सकाळची शाळा सुरू झाल्याने लवकर उठणे लवकर सातच्या शाळेत  जाणे नाही गेलो तर शिक्षा होण्याची व्हायची. शाळेच्या गेट बाहेर उभे करणे नंतर पुन्हा ग्राउंड वर राऊंड मारणे अशा प्रकारची शिक्षा असायची.

 शिक्षा होऊ नये म्हणून सकाळी लवकर उठून शाळेत जाणे आणि त्या क्रम असायचा.

ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असल्यामुळे रामायण महाभारत रविवारी असे कार्यक्रम असायचे. व बारा वाजता शक्तिमान  मालिका असायची शनिवारी असायचे. मजेशीर गोष्ट म्हणजे जसा शक्तिमान गोल गोल फिरत होता तसा स्वतःभोवती फिरायचा आम्ही देखील तसं करायच.

 हिंदी  पिक्चर शनिवारी  व रविवारी  असल्याने बाबाला  मस्का लावायचे . बघू  द्या ना टीव्ही म्हणून त्यांना त्यांच्या  झोपताना हात पाय चेपायचे . त्यांच्या पाटीवर चडून उड्या   मारायच्या. किती छान होत्या त्या आठवणी पाहिजे त्यांना मानयाचे  किती छान होते ना ते आठवणी.


लागेल तेव्हा खेळायचे केव्हाही  एक बागडायचे. असं म्हणून दिवसभर खेळत बसायचे याच सागर्गोट्या ,काच बांगड्या, असे उन्हाळी खेळ खेळायचे.

 शाळेत सुट्टी पडली की गावी जायचे आहे असे वेध  लागायचे. उन्हाळ्यात सुट्टी फिरायला जाणे असा क्रम असायचा खूप छान बालपण गेले असे वाटते. काय कळत होते खेळाशिवाय मैत्रिणी शिवाय काही कळत नव्हते.

 आपली संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. पण ती चे बालपण कसे असते? एकदा ती ला विचारून बघा ती काय बोलते. आताशी आपला समाज सुधारत आहे. २१ व्या शतकातील पिढी चे विचार बदलत आहे.

 काही चे बालपण हे दुःखात जाते. तर काही चे बालपण छान जाते. काही नी आपले बालपणात आपल्या आई वडिलांना गमवले. तर काही ना काम म्हणजे(बालमजुरी ) करावे लागले. कारण प्रत्येकाचे बालपण हे वेगवेगळे आहे. 




 तसे बघायला गेलो तर ती चे बालपण निराशाजनक असते .कारण ती चे बालपणात कामे करावी लागते. भांडी घासणे ,कापडी धूने झाडू मारणे, लहान मुलांना संभाळ करावा लागतो ते हि लहान वयात, पाणी भरणे लहान वयात जेवण बनवणे अशी ही कामे करावे लागते.

 मुलीला ला कामे करावी लागते.मुलांना कामे नाही लावत.कारण तो वंशाचा दिवा असतो. अजूनही मुलीला शिकवले जात नाही तर ती परक्याची धन आहे .

 ती थोडीच इथे राहणार आहे. तिचे लग्न करून तिला दुसऱ्यांच्या घरी जावे लागते.मग शिकून काय करणार. आजही असे विचाराचे लोक आहेत. मुलगी काय फक्त चूल आणि मुलं एवढेच काम असते का? 
 मैत्री म्हणजे  काय जाणून  घ्ययचे असेल तर नक्की हे हि वाचा  मैत्री म्हणजे काय ? 
आपला समाज पुढे चालाय. आपण पण सुधारले पाहिजे.घरातील कामे आणि शिक्षण पासून वंचित राहावे लागते. हे बालपण असताना सगळ्या मुलींना भोगावे लागते. 

https://maturutva.blogspot.com/
मैत्रीण


लहान मुलांचा लैंगिक शोषण

एवढ्यावर थांबले नाही तर मुलीला अजून  एक मानसिक आणि शाररिक त्रासाला सामोरे जावे लागते.ते म्हणजे मुलीला लहान असो की मोठे शारीरिक त्रास सहन करावा लागतो.

 बालपण असते छान गोष्टी ऐकायचं खेळायचे मस्त पैकी फुळपाखरू सारखे बागडयचे असते.पण आपला समाज तसे करू देत नाही आणि जगू देत नाही. स्त्री म्हंटले की त्याच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलींना पण सोडत नाही किती तरी केसेस झल्या मुलींना आपला जीव गमवावा लागला.

किती अत्याचार केला चिमुरड्यांवर  आणि किती यातना सहन केल्या मुलींनी अशा नराधमाना जिवंत जाळले पाहिजे.  आपण बालपणाच्या गोष्टीवर  खूप आठवणी असतात.काही गोड तर काही कडू असतात.  अश्या कितीतरी  मुली त्यातून जात असतात.


 काही काही तर ओळखीची माणसे असे कृत्य करत असतात.  त्या लहान मुलीना काय कळत असते? ते किती निरागस असतात. एवड्या लहान वयात  एवड्या यातना भोगावे लागते.

  आणि त्याचे बालपण कुटे जाते ? त्यांच्यामध्ये एवढी भीती बसते कि, ते पुढचे आयष्य जगू शकतील का? काही मुली बलात्कार चे बळी पण पडतात. मग ताच्या आई बाबा नि काय करावे लागते.

 कोणाकडे बघायचे? ते आदीच आपल्या मुलीवर अशी वेळ आल्याने  त्यांना खुप चिंता असते. मग आई वडिलांनी काय करावे. बलात्कार करणारा पुरुष असतो. आपला समाज पण पुरुषप्रधान  आहे. मग त्यांचेच नियम कायदे लागणार का फक्थ पुरुषांना च का  ? कधी बदलेल आपली मानसिक दृष्टी आणि किती त्रास सहन करावा या लहान चिमुरड्याने.  अजून  किती लहान चिमुरड्या व वर बेतणार आहे ? तांच्या घरी आई ,बहिण ,, मुली नसतील का?  जेव्हा तुमच्या आई, बहिण किवा मुलीवर अशी वेळ आली तर काय करणार?. काय करायचे? तुम्हीच सांगा.


मुलीना राटे ट्रेनिंग   

मुलीना कराटे प्रशिक्षण दिले तर आपली मुलगी आपले संरक्षण करू शकते. तिला आत्ता पासून कोणावर  अवलंबून राहावे नाही लागणार .

बालपण  पुन्हा पुन्हा येत नाही .खूप छान असते .मोठे झाल्यावर किंवा आजही असे वाटते की,पुन्हा बालपण अनुभवयाला मिळाले तर की,किती मज्जा येईल असे बालपण असते.

 सगळे जण खूप लाड करतात मामा, मावशी अजी आजोबा.आपण नवंनविन खेळ चालू असतो. 
लहान असताना खूप सारे ड्रेस ,खेळणी , कोण कोण ना घेत असते.काही मुलांना तर  खेळायला खेळणी , कपडे , दोन वेळचे जेवण भेटत नाही अशामुळे मुलं ही कुपोषित होऊन मरण पावतात.
 आणि योग्य आहार नाही घेतला तर बाळाच्या हातापायाच्या काड्या दिसू लागतात.

बालपण

बालपण हरवले आहे का? असे सतत वाटत असते. हल्ली धावपळीचे युगात बालपणा खेळाचे संगोपन कसे करायचे या गोष्टी राहून जातात.

 ग्रामीण भागात मोकळी व मोकळे मैदान मोकळी हवामान मोकळे घर खूप सारे मोठे घर यामुळे मुलांना खेळण्यात आत बाहेर जागा असतील फिरायला असतं.


शहरी भागात वाढते प्रदूषण फ्लॅट म्हणजे बंदिस्त करे यामुळे बालपणाच्या खेळाच्या गोष्टी त्या राहून जातात असे वाटायला लागले शहरात पुरेशी जागा नसल्याने मुले कोंबले गेले फक्त घरातल्या घरात राहून मुलं एकलकोंडा वाढू लागला आहे.

 मामाचा पत्र हरवला असे खेळ त्याकाळी खेळले जायचे आता त्याची जागा मोबाईलने घेतले त्यामुळे मुलांचा वेळ जास्त मैदानात न जाता घरात राहून मोबाईलवर जास्त चालला आहे. लहान मुलांना सांगायला लागत नाही. मात्र तरी खूप हुशार असल्यामुळे त्याचे उत्तर देताना पालकांना दाखवत आहे.


लहान मुलांना वेळ देणे खूप महत्त्वाच्या हल्ली लहान कुटुंब असल्यामुळे घरामध्ये फक्त आई-वडिलांनी मुलं असतात आई-वडील पण कामावर गेल्यामुळे त्यांना मुले ही एकटी पडलेली असतात .

आणि पालकांचे वेळा मोबाईलवर पण जास्त असल्यामुळे त्यांच्या अनुकूलमुळे करत असा दिवसभर काम करून थकल्यामुळे पालकांचे लक्ष नसतो.मुलांना वेळ द्यायला द्यायला पाहिजे .पण बालपणात मुलांना वेळ द्यायची गरज आहे. सवय हि बालपणातच लावली जाते नंतर सगळ्या लागत नाही.


आणखी माहिती किवा ब्लोग वाच्याचे असतील  नक्की हे वाचा MC म्हणजे काय असते ? मासिक पाळी म्हणजे काय

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)